आशा फाउंडेशननवी मुंबई
“स्त्रियांना शिक्षित करून, आपण पिढ्यांना शिक्षित करतो आणि एक न्याय्य समाज घडवतो..”
- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
आई-वडिलांच्या मायेचे छत्र नसलेल्या 'सावित्रीच्या लेकीं'चा शैक्षणिक, मानसिक, शारीरिक, कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन करून त्यांचा सर्वांगीण विकास साधून त्यांना सक्षम बनवणे आणि शिक्षणाचा पाया भक्कम करून त्याद्वारे आदर्श समाज घडवण्यासाठी प्रयत्न करणे हेच 'आशा फाउंडेशन' चे उद्दिष्ट आहे.
शिक्षण संस्था
शाळा व महाविद्यालये
शिक्षित सावित्रीच्या लेकी
“वेदनेला वेदनेचा, स्पर्श असू दे, माणुसकीत मानवतेचा, अंश असू दे! मिरवले दुःखही ज्याने, कपाळी अबीर जसे, उभा त्याचा हा, संघर्ष असू दे!”

आमच्याबद्दल
सक्षम लेक, आदर्श समाज.
३ जानेवारी म्हणजे भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले' यांची जयंती! त्यांच्या जयंतीदिनी म्हणजेच '३ जानेवारी २०२४' रोजी 'आशा फाउंडेशन, नवी मुंबई' ची स्थापना करण्यात आली.
एकल पालक व अनाथ 'सावित्रीच्या लेकींना' सक्षम करून आदर्श समाज घडवणे हे उद्दिष्ट ठेवून सातारा जिल्ह्यातील 'लोणंद' या छोट्या गावातून ५ मुलींपासून सुरुवात करून सातारा व रायगड जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक संस्था, शेकडो शाळा व महाविद्यालये आणि हजारो मुलींची सेवा 'आशा फाऊंडेशन' ने केली आहे.
'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले' यांच्या द्वितीय जन्म शताब्दी पर्यंत म्हणजेच ३ जानेवारी २०३१ पर्यंत महाराष्ट्रातल्या २ लाख एकल पालक व अनाथ मुलींपर्यंत पोहचणे हे 'आशा फाऊंडेशन' चे ध्येय आहे.
" आशा फाऊंडेशन " च्या माध्यमातून राबवण्यात येणारे उपक्रम
अनाथ आणि एकल पालक असलेल्या मुलींचे सर्वांगीण विकास करून त्यांचे सक्षमीकरण करणे आणि एक आदर्श समाज घडवणे.
आशा शिष्यवृत्तीचे निकष
शिष्यवृत्तीसाठी आवश्यक पात्रता
मुलगी ५ वी ते पदवी पर्यंत कोणत्याही वर्गात शिकत असली पाहिजे.
मुलगी अनाथ (एक किंवा दोन्ही पालकां चे छत्र नसलेले) असावी
मुलगी/तिचे कुटुंब/पालक दारिद्र्य रेषेखालील असावे (पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड असावे)
* आशा शिष्यवृत्ती ही सध्या सातारा व रायगड जिल्ह्यातील मुलींसाठीच सुरू आहे।
आमचे संस्थापक
आशा फाउंडेशन मागील दूरदृष्टी

श्री. दत्तात्रय जगताप
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक
श्री. दत्तात्रय जगताप यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील 'लोणंद' येथे झाला. अजाणत्या वयात आई व वडिलांचे छत्र हरवल्यानंतरही त्यांनी अनेक वेदना सहन करून आलेल्या संकटावर स्वार होऊन जिद्द व कष्टाच्या बळावर व्यावसायिक बनले. उत्तम व्यावसायिक झाल्यावर समाजासाठी कार्य करण्याचे ठरवले. याच संकल्पनेतून त्यांनी 'आशा फाउंडेशन' ची स्थापना केली.
अधिक वाचा
सौ. रूपाली जगताप
सहसंस्थापक व संचालक
सौ. रूपाली जगताप यांचा विवाह श्री. दत्तात्रय जगताप यांच्याशी झाला. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांनी अर्धांगिनी म्हणून साथ देत कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. आशा फाउंडेशनची स्थापना झाल्यापासून त्यांनी समाजकार्यामध्ये स्वतःला झोकून दिले. आशा फाउंडेशन सोबत जोडणाऱ्या प्रत्येक 'सावित्रीच्या लेकी'ची आई बनून त्यांना मायेचा आधार देतात.
अधिक वाचाआमच्या ब्लॉगवरून नवीन
बातमी आणि अपडेट्स
नवीन कथा लोड होत आहेत...