Aasha Gaurav Puraskar
पुरस्कार

आशा गौरव पुरस्कार २०२६

महिला सक्षमीकरण, शिक्षण, सामाजिक परिवर्तन आणि समाजहितासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकल पालक व अनाथ मुली व महिलांचा गौरव सोहळा

०८ मार्च २०२६
सातारा, महाराष्ट्र

०८ मार्च २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्याने आशा फाऊंडेशन, नवी मुंबई तर्फे आयोजित “आशा गौरव पुरस्कार २०२६” सोहळा सातारा येथे उत्साहात संपन्न झाला.

सातारा जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकल पालक व अनाथ मुली तसेच संघर्षातून उभ्या राहिलेल्या प्रेरणादायी महिलांचा “आशा तेजस्विनी” व “आशा स्वयंयंसिद्धा” पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला.

या सोहळ्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते समाजासाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या कु. शिवानी बाळासो दडस यांना पहिलावहिला “आशा तेजस्विनी पुरस्कार २०२६” आणि कु. दिपाली शिवाजी घोलप यांना “आशा स्वयंयंसिद्धा पुरस्कार २०२६” प्रदान करण्यात आला. त्यांच्या जिद्द, मेहनत आणि कर्तृत्वामुळे आज अनेकांसाठी नवी दिशा निर्माण झाली आहे.

आशा फाऊंडेशन, नवी मुंबई.

Aasha Gaurav Puraskar Event
पुरस्कार सोहळ्यातील काही क्षणचित्रे
Award Event 0
Award Event 1
Award Event 2
Award Event 3
Award Event 4
Award Event 5
Award Event 6
Award Event 7
Award Event 8
Award Event 9
Award Event 10
Award Event 11
Award Event 12
Award Event 13

प्रदान केलेले प्रमुख सन्मान

आशा गौरव पुरस्कार २०२६

आशा तेजस्विनी २०२६
कु. शिवानी बाळसो दडस

बालपणी वडीलांचे छत्र हरवल्यामुळे शिवानीचा सांभाळ आई ,आजोबा, मामा यांनी केला. परिस्थिती हलाखीची असताना सुद्धा शिवानीने स्वत:च्या कष्टाने व मेहनतीने आपले शिक्षण पूर्ण केले. इयत्ता दहावी मध्ये ९० टक्के मार्क पाडून एक आदर्श विद्यार्थिनी ठरली. त्यानंतरचे शिक्षणही अतिशय कष्टाने, जिद्दीने व चिकाटीने घेत शिवानीने अनेक मुलींच्या समोर आदर्श ठेवला आहे. आशा फाउंडेशन शिवानीला 'आशा तेजस्विनी पुरस्कार 2026' देऊन तिच्या मेहनतीचे, कष्टाचे व जिद्दीचे कौतुक करत आहे.

निवडीचे निकष

आशा तेजस्विनी पुरस्कार 🏆 - मुलगी एकल पालक किंवा अनाथ असावी, वय वर्षे १० ते २१, इयत्ता ५ वी ते पदवी पर्यंत शिकत असावी, शिक्षण / क्रीडा / कला /तंत्रज्ञान/कौशल्य आधारित/समाज नेतृत्व/ इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी

आशा तेजस्विनी २०२६
कु. शिवानी बाळसो दडस
आशा गौरव पुरस्कार २०२६

आशा स्वयंसिद्धा २०२६
कु. दिपाली शिवाजी घोलप

काहींचा संघर्ष हा जन्माच्या आधीपासूनच सुरू होतो. कु. दिपाली शिवाजी घोलप हिचा संघर्ष काहीसा असाच आहे. मुलगी नको म्हणून लहानपणीच वडिलांच्या त्रासाला सामोरे जावे लागले त्यामुळे आई घरातून बाहेर पडली आणि तिथून सुरू झाला दीपालीचा खरा संघर्ष! समाजातील कोणत्याही व्यक्तीच्या मदतीशिवाय दीपाली, तिची आई व तिची आजी या तिघींनी स्वतःचे एक जग उभे केले आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून, संघर्षातून, जिद्द व चिकाटीने स्वतःचे शिक्षण पूर्ण करून अत्यंत चांगली नोकरी मिळवली. दिपाली ही आज सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहे. तिची ही जिद्द, चिकाटी व तिचा हा संघर्ष अनेकांना प्रेरणा देणार आहे. आशा फाउंडेशन दिपाली हिला 'आशा स्वयंसिद्धा पुरस्कार 2026' देऊन तिच्या संघर्षाचा, जिद्दीचा, चिकाटीचा गौरव करत आहे.

निवडीचे निकष

आशा स्वयंसिद्धा पुरस्कार 🏆- बालपणी आई किंवा वडील अथवा दोघांचेही छत्र हरवलेल्या महिला, वय वर्षे २४ वरील, विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान असलेल्या महिला

आशा स्वयंसिद्धा २०२६
कु. दिपाली शिवाजी घोलप